Other
स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
कार्यकर्तृत्वाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आदरांजली
जळगाव/मुंबई, दि.२२ -: राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मंत्रालयात आयोजित शासकीय जयंती कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “स्व.अजितदादा पवार यांनी सार्वजनिक जीवनात विकासाभिमुख दृष्टी, लोकहिताची बांधिलकी आणि प्रभावी प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांचे कार्य, कर्तृत्व आणि जनसेवेचा वारसा भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.”
या शासकीय जयंती कार्यक्रमास पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी व
कर्मचारी उपस्थित होते.
**********






