दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार 2026 साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार 2026 साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन
जळगाव, दि. 22 जुलै (जिमाका)– वर्ष 2026 च्या दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज व नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक पात्र व्यक्ती व संस्थांनी 31 जुलै 2026 पर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण, जिल्हा परिषद यांनी केले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल 15 मे 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत सुरू असून, www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज व नामांकन सादर करता येणार आहेत. 31 जुलै 2026 पर्यंत प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जांचा वर्ष 2026 च्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी विचार केला जाणार आहे.
अर्ज केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. अर्जामध्ये विहित नमुन्यानुसार सर्व आवश्यक तपशील भरून उल्लेखनीय व प्रेरणादायी कामगिरीचे वर्णन स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कामगिरीची सहाय्यक कागदपत्रेही पोर्टलवर अपलोड करावीत.
सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन (Most Outstanding Person with Disabilities), श्रेष्ठ दिव्यांगजन (Outstanding Person with Disabilities) आणि श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बालक/बालिका (Outstanding Creative Divyang Child) या उप-वर्गवारींसाठी अर्ज करताना यूडीआयडी (UDID) कार्ड अथवा दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे. प्रत्यक्ष (Physical Mode) किंवा इतर कोणत्याही माध्यमातून सादर करण्यात आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
पात्रतेचे निकष व इतर सविस्तर माहितीसाठी www.depwd.gov.in तसेच www.awards.gov.in या संकेतस्थळांवरील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या मार्गदर्शक सूचनांचा संदर्भ घ्यावा, असे आवाहन पी. एस. म्हस्के, सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण, जिल्हा परिषद, जळगाव यांनी केले आहे.






