Crime

यवतमाळ विभागासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

यवतमाळ विभागासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती नकारात्मक बातम्यांचा खुलासा तातडीने सादर करण्याचे निर्देश

यवतमाळ: राज्य शासनाच्या गृह विभागाने जारी केलेल्या परिपत्रक क्रमांक संकीर्ण-०३२५/प्र.क्र ४६/आस्था-१, दिनांक २६ मार्च २०२५ नुसार, वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नकारात्मक बातम्यांचा खुलासा तातडीने सादर करण्यासाठी यवतमाळ घटकात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस उप-अधीक्षक (गृह), यवतमाळ यांची नोडल अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

परिपत्रकात नमूद केल्यानुसार, शासनाच्या विविध निर्णय, योजना आणि कार्यक्रमांबाबत वस्तुस्थितीला धरून नसलेल्या किंवा नकारात्मक बातम्यांसंदर्भात त्वरित खुलासा उपलब्ध करून देण्यासाठी गृह विभागाने ३१ जानेवारी २०२५ रोजी विभागीय स्तरावर समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. आता स्थानिक, विभागीय आणि राज्यस्तरीय वृत्तपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये गृह विभागाशी संबंधित नकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्यास त्याच दिवशी किंवा पुढील लगतच्या दिवशी संबंधित माध्यमांकडे वस्तुस्थितीदर्शक खुलासा सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

यवतमाळ घटकासाठी नियुक्त पोलीस उप-अधीक्षक (गृह) यांना निर्देश देण्यात आले आहेत की, गृह विभागाशी संबंधित नकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्यास त्याचा खुलासा तातडीने संबंधित वृत्तपत्रे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडे सादर करावा. जर खुलासा सादर करण्यात टाळाटाळ झाल्यास, शासनाच्या निर्देशांचे पालन न केल्याचा निष्कर्ष काढून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही परिपत्रकात देण्यात आला आहे.

या नियुक्तीमुळे नकारात्मक बातम्यांमुळे निर्माण होणारा गैरसमज दूर करण्यात आणि शासनाच्या कार्याची अचूक माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button