
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली असून “रुदांता रेस्ट्रो” या आकर्षक आणि आधुनिक रेस्टॉरंटचे भव्य उद्घाटन रविवारी दि.२४ मे रोजी सायंकाळी झाले. पारंपरिक चवीला आधुनिकतेची जोड देत जळगावकरांसाठी एक वेगळा आणि आलिशान अनुभव देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.
“इथे फक्त जेवण मिळत नाही, इथे मातीची ओळख मिळते” या संकल्पनेवर आधारित रुदांता रेस्ट्रोमध्ये पिढ्यानपिढ्या जपलेले मसाले, पारंपरिक रेसिपी आणि प्रत्येक पदार्थात ओतप्रोत प्रेम अनुभवायला मिळणार आहे. फाईन डायन रेस्टॉरंट, फॅमिली डेस्टिनेशन, रॉयल बँक्वेट आणि स्काय ग्रीन पार्टी लॉन अशा विविध सुविधा येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
या भव्य उद्घाटन सोहळ्यास राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख व्यक्तींची उपस्थिती होती. याशिवाय अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी देखील उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
आधुनिक इंटिरियर, आकर्षक वातावरण, किड्स प्ले एरिया
छत्रपती संभाजी नगर हायवेवरील विमानतळासमोर, गट नं. १७१/१, कुसुंबा शिवारा येथे उभारण्यात आलेले हे रेस्ट्रो आधुनिक इंटिरियर, आकर्षक वातावरण, किड्स प्ले एरिया आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांमुळे जळगावकरांचे नवीन आकर्षण ठरणार असल्याची चर्चा आहे.
जळगावकर नागरिकांनी कुटुंबासह रुदांता रेस्ट्रोच्या नव्या खाद्यसंस्कृतीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन संचालक सुरेश तलरेजा, सनी कटारिया, निशांत तलरेजा यांनी केले आहे.






