Other

शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील 63,511 कर्जखात्यांची माहिती शासनच्या पोर्टलवर अपलोड

शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील 63,511 कर्जखात्यांची माहिती शासनच्या पोर्टलवर अपलोड

जळगाव, शासनाच्या 2 जून,2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026 राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणींतर्गत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 63 हजार 511 कर्जखात्यांची, एकूण 332.27 कोटी रुपयांच्या कर्जरकमेची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या दि. 6 जुलै 2026 नंतर तालुकास्तरावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक यांनी दिली आहे.

दरम्यान, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने दिनांक 11 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरीय समिती गठित करण्यास मान्यता दिली आहे. या समितीची पहिली बैठक नुकतीच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेत समितीतील सर्व सदस्यांना शासन निर्णयातील सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक धर्मराज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button