सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार’साठी अर्ज करण्याचे आवाहन

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार’साठी अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय, नाविन्यपूर्ण आणि प्रभावी कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) तर्फे दिल्या जाणाऱ्या ‘सुभाषचंद्र बोस आपदा व्यवस्थापन पुरस्कार-2027’ साठी नामांकने मागविण्यात आली आहेत. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
आपत्ती जोखीम कमी करणे, आपत्तीपूर्व तयारी, बचाव व मदतकार्य, पुनर्वसन, क्षमता विकास, जनजागृती, संशोधन तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातून विविध क्षेत्रांतील किमान पाच नामांकनांची शिफारस करण्यात येणार असून पात्र व्यक्ती आणि संस्थांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन नामनिर्देशन सादर करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.






