Gold-Silver Rate | सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी, पाहा आजचा ताजा अपडेट

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । सराफ बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. भंगाळे गोल्ड दालनाच्या ताज्या आकडेवारीनुसार २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१,१७,२५०, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,२८,००० इतका झाला आहे. चांदीचा दरही चढत ₹१,७४,००० प्रति किलो नोंदवला गेला आहे.
सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमुळे बाजारात सोन्या-चांदीची मागणी वाढलेली आहे. हलके वजनाचे डिझाईन्स, प्रीमियम कलेक्शन आणि पारंपरिक लग्न सेट्सना ग्राहकांची मोठी पसंती दिसत आहे. जळगाव आणि सावदा येथील भंगाळे गोल्ड दालनात नवीन कलेक्शन पाहण्यासाठी ग्राहकांचा सतत ओघ कायम आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील दरातही वाढ दिसून येत असल्याने स्थानिक बाजारावर त्याचा थेट परिणाम जाणवू लागला आहे. डॉलर निर्देशांकातील हालचाल, क्रूड ऑइल किमती आणि जागतिक आर्थिक घडामोडींनुसार पुढील दिवसांत दरात आणखी बदल होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
आजचे दर — (BHANGALE GOLD : JALGAON & SAVDA)
धातू कॅरेट आजचा दर
सोने 22K ₹१,१७,२५० प्रति तोळा
सोने 24K ₹१,२८,००० प्रति तोळा
चांदी किलो ₹१,७४,००० प्रति किलो
(Rates may change during the day)




