नवरात्रोत्सवात सोने-चांदी भावात पुन्हा वाढ; चांदीला एकाच दिवसात अप्पर सर्कीट!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । नवरात्रोत्सवात सोनं-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू असतानाच आज पुन्हा दरवाढ झाली आहे. भंगाळे गोल्ड (जळगाव व सावदा) यांच्या माहितीनुसार, सोन्याचा दर थोडासा वाढला असला तरी चांदीने तब्बल नवा उच्चांक गाठला आहे.
आजच्या दरांनुसार, २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,०४,२४०, तर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,१३,८०० झाले आहे. दरम्यान, चांदीचा दर ₹१,३९,५०० प्रति किलो झाला असून, हा दर गेल्या काही दिवसांतील सर्वाधिक आहे.
काल किंचित घट झाल्यानंतर आज सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात तब्बल ₹३,५०० ची उसळी पाहायला मिळाली आहे. आगामी दिवाळी आणि लग्नसराईच्या खरेदीचा हंगाम जवळ आल्यामुळे खरेदीदारांमध्ये उत्साह वाढला आहे.
भंगाळे गोल्डमध्ये सध्या आकर्षक उत्सवी योजना, विविध ऑफर्स, आधुनिक तसेच पारंपरिक डिझाईनमधील दागिने आणि शुद्धतेची हमी यामुळे ग्राहकांचा ओघ वाढला आहे. सोनं-चांदीचे भाव उच्चांकावर असतानाही नागरिक या काळात खरेदीला शुभ मानून मोठ्या संख्येने दालनांकडे धावत आहेत.





