सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ! सोन्याने १.२७ लाखांचा टप्पा गाठला, चांदी किंचित घसरली

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून बाजारपेठांमध्ये सजावट, खरेदी आणि ऑफर्सचा उत्साह वाढला आहे. त्याचबरोबर सोने-चांदीच्या दरात पुन्हा एकदा हालचाल दिसून येत आहे. भंगाळे गोल्ड (जळगाव व सावदा) यांच्या ताज्या दरानुसार आज, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सोन्याचा दर पुन्हा तेजीत तर चांदीचा दर किंचित घटलेला दिसतो.
असे आहेत आजचे दर :
- २२ कॅरेट सोने: ₹१,१६,९७० प्रति तोळा
- २४ कॅरेट सोने: ₹१,२७,७०० प्रति तोळा
- चांदी: ₹१,७८,००० प्रति किलो
(Rates may change during the day)
गेल्या काही दिवसांत सोन्याने स्थिरता राखली असली तरी दिवाळीपूर्वी खरेदीचा उत्साह आणि गुंतवणूकदारांचा कल लक्षात घेता दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात सोने ₹१.३१ लाखांच्या पातळीवर गेले होते, तर आता ते किंचित खाली येऊन स्थिर होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, दिवाळी आणि लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्याची मागणी आणखी वाढेल आणि दरात पुन्हा तेजी पाहायला मिळेल. चांदीच्या दरात हलकी घट झाली असली तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांदी अजूनही आकर्षक पर्याय ठरत आहे.
जळगाव आणि सावदा येथील ग्राहकांसाठी भंगाळे गोल्डकडून नेहमीप्रमाणे शुद्धतेची हमी, आकर्षक ऑफर्स आणि पारदर्शक व्यवहार यामुळे सोन्याच्या खरेदीत ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.




