Gold-Silver Rate | सोन्या-चांदीच्या दरात सतत वाढ; चांदीने झेप घेतली, सोन्याने तोडले सर्व विक्रम

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । दिवाळीपूर्वी सोन्याच्या बाजारात वाढीचा ट्रेंड कायम असून, सोन्याने दररोज नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. बुधवारी पुन्हा एकदा दरात मोठी वाढ झाली असून, चांदीतसुद्धा झपाट्याने उसळी दिसून आली आहे.
भंगाळे गोल्ड (जळगाव व सावदा) यांच्या माहितीनुसार आजचे दर खालीलप्रमाणे आहेत. २२ कॅरेट सोने प्रति तोळा – ₹१,१२,२१०, २४ कॅरेट सोने प्रति तोळा – ₹१,२२,५००, चांदी प्रति किलो – ₹१,५३,५०० असे आजचे दर आहेत.
मागील आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल ₹३,००० पेक्षा जास्त वाढ झाली आहे. चांदीतसुद्धा ₹२,५०० पेक्षा अधिक वाढ झाली असून, तज्ज्ञांच्या मते दर ₹१,५०,००० प्रति किलो या ऐतिहासिक आकड्याला पार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिवाळी आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी वाढत असून, नागरिक गुंतवणुकीसाठी तसेच दागिने खरेदीसाठी भंगाळे गोल्डमध्ये मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. आकर्षक डिझाईन्स, सणासुदीच्या ऑफर्स आणि शुद्धतेची हमी या वैशिष्ट्यांमुळे भंगाळे गोल्ड ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरमधील घट, आणि गुंतवणूकदारांचा कल या सर्व घटकांचा परिणाम म्हणून दर वाढीचा कल कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.




