Other

आकाशवाणी चौकातील मुरली मनोहर हॉटेलच्या किचनला आग

आकाशवाणी चौकातील मुरली मनोहर हॉटेलच्या किचनला आग

जळगाव : शहरातील आकाशवाणी चौकातील हॉटेल मुरली मनोहरच्या किचनमध्ये गुरुवार दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीमुळे बाजूला असलेल्या मेडीकलच्या दुकानाचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, अग्निशमन विभागाच्या बंबाने आगीवर नियंत्रण मिळवित आग आटोक्यात आणली.

शहरातील आकाशवाणी चौकातील तळघरात असलेल्या हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना समजताच, परिसरातील नागरिकांनी तत्काळ घाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. नागरिकांची मदत मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत आग विझवण्याचे काम सुरू केले. त्याचबरोबर नागरिकांनी परिसरातील दुचाकी आणि इतर वाहने सुरक्षित ठिकाणी हलवली,

ज्यामुळे आणखी कोणतेही नुकसान होण्यापासून टळले. घटनेची माहिती मिळताच पोलिस विभाग आणि अग्निशमन दल तात्काळ कारवाईसाठी दाखलझाले.

जनरल अरुण कुमार वैद्य चौकातील सुप्रसिद्ध हॉटेल मुरली मनोहरच्या किचनमध्ये आज दुपारी आग लागली होती.

आगीचे कारण हॉटेलच्या बाहेरच्या बाजूने एक्झॉस्ट फॅन जवळ काही चिंध्या वगैरे कचरा पडलेला असावा बाहेरून कोणी बिडी वगैरे पेटवून पेटती काडी फेकल्याने सदर चिंध्यांना आग लागली. एक्झॉस्ट फॅन च्या जाळीला व किचनच्या पत्र्याच्या सिलिंगवर फोडणीचे तेल चिकटत असते त्यानेही पेट घेतला होता. हॉटेलमध्ये
अग्नि सुरक्षेसाठी ४ फायर हायड्रंट होतेच, ३ हायड्रंट द्वारे आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यात यश आले. तोपर्यंत अग्निशामक बंब देखील दाखल झाला होता.

आग छताच्या पत्र्याला लागली असल्याने किचनमध्ये सुदैवाने कोणतेही नुकसान झालेले नाही.

हॉटेल संध्याकाळ पासून खवय्यांच्या सेवेमध्ये पूर्वत चालू राहील असे हॉटेल मुरली मनोहर चे संचालक लेखराज जी उपाध्याय यांनी कळविले .

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button