Crime

चोपडा वनपरिक्षेत्रात सागवान लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांचा वन कर्मचाऱ्यांवर हल्ला

आरोपींच्या घराच्या झडतीत सागवान लाकडांचा सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

चोपडा वनपरिक्षेत्रात सागवान लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांचा वन कर्मचाऱ्यांवर हल्ला

आरोपींच्या घराच्या झडतीत सागवान लाकडांचा सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

चोपडा प्रतिनिधी

अवैध वृक्षतोड करून वन कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवून जखमी केल्याची घटना चोपडा वनपरिक्षेत्रातील चौगांव कक्ष क्र. २६० मध्ये घडली असून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये विना क्रमांकाची मोटारसायकल, सागवान लाकूड ०.१५१ घ.मी असून त्याची अंदाजे किंमत ३०५६ रु. आणि चौगांव येथील एका आरोपीच्या घराची झडती घेतली असता, कटाई मशीन, लाकूड कापण्याची अवजारे, ३५ सागवान लाकूड नग आणि तयार पलंग या सर्वाची मिळून एकूण किंमत १,१४,६४४ रु. होते, या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात यांनी दिली.

दिनांक २४.०१.२०२५ रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) चोपड़ा यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार नियतक्षेत्र चौगांव कक्ष क्र. २६० मध्ये अवैध वृक्षतोड करीत असल्याचे समजताच वनपरिक्षेत्र चोपडा रेंज स्टॉफ यांनी घटनास्थळी जावून अवैध वृक्षतोड करुन मोटार सायकल वर साग नग वाहतूक करीत असता करणारे आरोपी इसम यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी इसम यांनी शासकीय कर्तव्यावर असलेले प्रकाश सुभाष पाटील, वनरक्षक चौगांव यांनी सदर वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी इसमांनी श्री पाटील, वनरक्षक यांच्या आंगावर सदर वाहन चढवून पावाल जबर मार लागल्याने ते जखमी झाले. जागेवर मोटार सायकाल अंदाजीत रक्कम २५,०००/- नग-०१ स्टनर कंपनीची विना क्रमाकं विना चेचेस नंबर व साग नग ०८, घ.मी-०.१५१, मा.कि. ३०५६/- मिळून आले मुददेमाल शासकीय वाहनाने मु.वि. केंद्र चोपडा येथे जमा केला,

सदर घटनेची माहिती मिळताच दिनांक २५.०१.२०२५ रोजी सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश वि.हाडपे,वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा बी. के. थोरात, (प्रा) यांनी उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे जावून प्रकाश पाटील, वनरक्षक चौगांव यांच्या तब्येतीची विचारपूस करून नंतर रेंज स्टॉफ यांचेसह मौजे चौगांव गावापासून जवळच्या शेत शिवार भागात शसंजय प्रकाश कोळी, रा चौगांव यांना झडती वारंट बजावून त्यांचा घराची तपासणी केली असता त्यांच्या तळघरात कटाई मशीन -०१ व इतर लाकूड कटाई अवजारे अंदाजीत रक्कम १,००,८५० व साग नग ३५, घ.मी ०.३८४ व माल किंमत १०,७३८/- तयार पलंग नग १ (४४६) मिळून आले. एकंदरीत जप्त मुद्देमाल किंमत १,१४,६४४/- सदरचा माल जप्त करुन शासकीय वाहनाने मु.वि. केंद्र चोपडा येथे जमा केला.

यांनी केली कारवाई

हि कारवाई श्रीमती निनू सोमराज मॅडम, वनसंरक्षक धुळे (प्रा.) वनवृत्त धुळे, जमीर एम.शेख, म.उप वनसंरक्षक, यावल वनविभाग जळगांव, व आर. आर. सदगीर, म. विभागीय वनअधिकारी (दक्षता) धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश वि.हाडपे, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या उपस्थितीत बी. के. थोरात, वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा (प्रा), आर.एस. मोरे, वनपाल सत्रासेन, अमोल पाटील, वनपाल लासुर (अ.कार्य) . शुभम पाटील, वनरक्षक लासुर, रोहित पावरा, बनरक्षक मोरचिडा, . प्रकाश पाटील, वनरक्षक चौगांव, श्री. शालीग्राम कंखरे, वनरक्षक अंधारमळी, संदिप पावरा वनरक्षक, श्री जनार्दन गुटटे, वनरक्षक पळासदरा, श्रीमती रिला पावरा, वनरक्षक सत्रासेन, श्रीमती सरला भोई, वनरक्षक लासुर उत्तर, श्रीमती सोनाली पावरा, वनरक्षक उमटी, श्रीमती अनिता बारेला, वनरक्षक श्रीमती पिंकी कोठारी, वनरक्षक, श्रीमती पोप्या बारेला, वनरक्षक गोविंदा चौधरी व मदन मराठे वाहन चालक तसेच मनोज

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button