Other

यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतील ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत रोजगार मेळाव्यात 1870 उमेदवारांना रोजगारांची संधी

यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतील ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत रोजगार मेळाव्यात 1870 उमेदवारांना रोजगारांची संधी

यवतमाळ प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतील ऑपरेशन प्रस्तावनांतर्गत राबविण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्यामध्ये 1870 उमेदवारांना रोजगारांची संधी मिळाली. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून उगनेकारांवर कार्यवाही करण्यापेक्षा गुन्हेगार घडणारच नाही यासाठी जिल्ह्यातील गुन्हेगारी कडे वळणाऱ्या तरुणांचे पाऊल रोखण्यासाठी व वाम मार्गाला लागलेल्या शाळा कॉलेज सोडलेल्या होतकरू तरुणांना प्रथमच ऑपरेशन प्रस्थान माध्यमातून एकत्र करून वेगवेगळ्या स्वरूपात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील तरुण वर्ग एकत्रित करून बेरोजगारीमुळे तो व्यसनाधीन कडे वळून वाम मार्गाला लागतो मात्र ऑपरेशन प्रस्थान च्या माध्यमातून अशा बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येत आहे. दिनांक 17 फेब्रुवारी रोजी ऑपरेशन प्रस्थान या उपअंतर्गत यवतमाळ येथील पोलीस कवायत मैदान येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्यामध्ये यवतमाळ बाबुळगाव कळंब दारव्हा गैर दिरास आर्मी येथून सोळाशे साठ पुरुष उमेदवार व दोनशे दहा महिला उमेदवार सुरक्षारक्षक पर्यवेक्षक पदाकरिता त्यांची चाचणी करण्यात आली, उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना कॅपिटल प्रशिक्षण फोर्स इंडिया लिमिटेड हैदराबाद येथे 21 दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉल शॉपिंग कॉम्प्लेक्स बँक कॉर्पोरेट कार्यालय आय टी आय टी एस उद्योग आणि कारखाने शाळा दवाखाने कंपन्या हॉटेल रिसॉर्ट या ठिकाणी व्हीआयपी सुरक्षा एस्कॉर्ट सुरक्षा गार्ड पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. या माध्यमातून या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था युनिफॉर्म व बूट इत्यादीसाठी 8300 शुल्क आकारण्यात येणार आहे. ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यातून उपलब्ध करून दिलेल्या रोजगार संधीचा उपयोग घेण्याचा संकल्प फाउंडेशन तर्फे करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलीस अधीक्षक पियू जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश वैशाली यांच्या सहकार्याने पोलीस निरीक्षक अजित राठोड रामकृष्ण जाधव नरेश रणधीर पीएसआय राऊत निलेश खंडारे मंजुळा पवार नलिनी गोटे भारती चव्हाण आदींनी या मेळाव्यासाठी परिश्रम घेतले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button