
बोदवडमध्ये हातात तलवार आणि कोयता घेऊन दहशत माजवणारा जेरबंद
एलसीबीच्या पथकाची कारवाई
बोदवड (प्रतिनिधी) : हातात तलवार घेऊन बोदवड शेलवड मार्गावर दहशत माजवणाऱ्या एका गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून कोयता आणि तलवार यासारखी हत्यारे जप्त करण्यात आली आहे.
दिनांक ०९ जून २०२५ रोजी पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, बोदवड ते शेलवड मार्गावर, तसेच महालक्ष्मी माता मंदिर, तपोवन या दिशेने एक जण हातात तलवार आणि कोयता घेऊन फिरत आहे व दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाल्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली. पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ. प्रितम पाटील आणि पो. अं. रविंद्र चौधरी यांच्या पथकाने पुरुषोत्तम श्रावण वंजारी (वय २६, रा. माळी वाडा, बोदवड) हा तलवार व कोयता हातात घेऊन परिसरात फिरताना आढळला. तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एकूण ₹४,५००/- किंमतीचे तलवार व कोयता असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध बोदवड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १०६/२०२५ अंतर्गत भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.