PoliticsSocial

मेरा युवा भारत”अंतर्गत जिलास्तरीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन

मेरा युवा भारत”अंतर्गत जिलास्तरीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन

जळगाव: “मेरा युवा भारत – फिट इंडिया फिटनेस क्लब्स” या उपक्रमांतर्गत जिलास्तरीय क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. केंद्रीय राज्य मंत्री, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, रक्षा खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू युवा केंद्र, जळगाव यांनी जानेवारी महिन्यात पाच विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांतील विजेत्यांनी १६ मार्च २०२५ रोजी एकलव्य अकादमी येथे झालेल्या जिलास्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला.

स्पर्धेतील खेळ आणि प्रमुख उपस्थिती:
या जिलास्तरीय स्पर्धेत कबड्डी, खो-खो, १०० मीटर धावणे आणि गोळा फेक या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. खासदार स्मिता ताई वाघ यांनी या स्पर्धेस उपस्थित राहून युवकांना “फिट इंडिया” मोहिमेला गती देण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी निरोगी जीवनासाठी क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक सहभागी होण्याचे महत्व पटवून दिले.

स्पर्धेतील विजेत्या संघांना आणि खेळाडूंना भारत सरकारच्या वतीने क्रीडा साहित्य किट प्रदान करण्यात आले. यावेळी मा. सांसद महोदया, जितेंद्र खर्चे (क्षेत्रीय संचालक, राशि सीड्स प्रा. लि.), कृष्णचंद बेरोलकर (निदेशक, एकलव्य अकादमी) आणि नरेंद्र (जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, जळगाव) यांच्या हस्ते विजेत्यांना पदक व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची रुपरेषा आणि संयोजन:
कार्यक्रमाची प्रस्तावना नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र यांनी मांडली, तर आभार प्रदर्शन अजिंक्य गवळी, लेखपाल, नेहरू युवा केंद्र, जळगाव यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तुषार साल्वे, मुकेश भालेराव, रोहन अवचारे, अनिल बाविष्कार, मनोज पाटील, योगेश चौधरी, साहिल साल्वे, सिद्धार्थ सोनवणे व भावेश अडकमोल यांनी अथक परिश्रम घेतले.

विजेत्यांची यादी:
कबड्डी:
प्रथम: संत मुक्ताई संघ, मुक्ताईनगर
द्वितीय: वॉरिअर संघ, चोपडा
तृतीय: जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल, यावल

खो-खो:
प्रथम: हीरा इंटरनॅशनल स्कूल, धरणगाव
द्वितीय: जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल, यावल
तृतीय: संत मुक्ताई महाविद्यालय, मुक्ताईनगर

१०० मीटर धावणे (पुरुष):
प्रथम: हिमांशु भालशंकर, मुक्ताईनगर
द्वितीय: करण चिखलकर, मुक्ताईनगर
तृतीय: कृष्णा धोबी, मुक्ताईनगर

१०० मीटर धावणे (महिला):
प्रथम: प्रतीक्षा महाजन, पाचोरा
द्वितीय: शोभा धनगर, मुक्ताईनगर
तृतीय: श्रुती सराफ, यावल

गोळा फेक (पुरुष):
प्रथम: गोपाल सपकाळे, मुक्ताईनगर
द्वितीय: तोषिब पटेल, पाचोरा
तृतीय: दीपक माळी, पाचोरा

गोळा फेक (महिला):
प्रथम: सविता परदेशी, यावल
द्वितीय: सोनी भील, पाचोरा
तृतीय: फाल्गुनी पवार, धरणगाव

ही जिलास्तरीय क्रीडा स्पर्धा युवकांना तंदुरुस्त जीवनशैलीकडे वळवण्यास मदत करेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. “फिट इंडिया” मोहिमेअंतर्गत अशा उपक्रमांचे आयोजन नियमित होण्याची अपेक्षा आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button