अमळनेरमध्ये राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त “एकता दौड” उत्साहात
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

अमळनेरमध्ये राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त “एकता दौड” उत्साहात
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन
अमळनेर प्रतिनिधी : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस २०२५ च्या औचित्याने जळगाव जिल्हा पोलीस दल व अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे “एकता दौड” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील महाराणा प्रताप चौक येथून सुरू झालेली ही एकता दौड श्री मंगळ ग्रह मंदिरापर्यंत उत्साहात पार पडली.

या दौडचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचे स्मरण करून एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश दिला. कार्यक्रमास नगरपरिषद अमळनेरचे मुख्याधिकारी, संबंधित अधिकारी व अंमलदार, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, तसेच शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
महाविद्यालये व शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माजी सैनिक, पत्रकार, वकील बांधव, तरुण मित्र परिवार, शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, पोलीस पाटील, होमगार्ड तसेच भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आणि मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य अशा तब्बल ३०० ते ३५० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.






