HealthSocial

मृत्यूच्या दाढेतून ८३ वर्षीय आजोबांची सुखरूप सुटका!

ब्रेन हॅमरेजवरील आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी;न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांचे यश

मृत्यूच्या दाढेतून ८३ वर्षीय आजोबांची सुखरूप सुटका!

ब्रेन हॅमरेजवरील आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी;न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांचे यश

 

जळगाव, प्रतिनिधी वय ८३ वर्षे, अपघातात डोक्याला गंभीर दुखापत आणि मेंदूत रक्तस्राव अशा अत्यंत गंभीर परिस्थितीत असलेल्या वृद्धाला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांच्या उपचारांमुळे नवजीवन मिळाले. ब्रेन हॅमरेजवरील आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर दशरथ हे पुन्हा स्वतःच्या पायावर चालू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

स्वच्छतागृहात पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत

दशरथ हे स्वच्छतागृहात गेले असताना अचानक तोल जाऊन पडले. या घटनेत त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने प्रकृती गंभीर झाली. ते बेशुद्धावस्थेत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील आणि डॉ. विपुल राठोड यांनी तपासणी सुरू केली.

सीटी स्कॅनमध्ये मेंदूत रक्तस्राव

रुग्णाच्या मेंदूची सीटी स्कॅन तपासणी केली असता, डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. तसेच शरीराच्या एका बाजूच्या हात-पायांची ताकद कमी झाल्याचेही आढळले. मेंदूतील रक्तस्राव आणि बिघडलेली न्यूरोलॉजिकल स्थिती पाहता परिस्थिती गंभीर होती. वेळेत उपचार न मिळाल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

८३ व्या वर्षी शस्त्रक्रियेचे आव्हान

वृद्ध रुग्णाचे वय लक्षात घेता शस्त्रक्रिया करणे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. शस्त्रक्रियेपूर्वीची तयारी, भूल, शस्त्रक्रियेदरम्यान घ्यावयाची काळजी आणि त्यानंतरची देखभाल या सर्व बाबी महत्त्वाच्या होत्या. मात्र, रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील, डॉ. विपुल राठोड आणि डॉ. अदिती जोशी यांच्या वैद्यकीय पथकाने आवश्यक खबरदारी घेत शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. काही दिवसांच्या उपचारांनंतर दशरथ पुन्हा स्वतःच्या पायावर चालू लागले. गंभीर ब्रेन हॅमरेजवर मात करून त्यांनी चालण्यास सुरुवात केल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

वृद्ध व्यक्ती पडल्यामुळे डोक्याला मार लागल्यास ती बाब गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. बाहेरून मोठी जखम दिसत नसली, तरी मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला असू शकतो. चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, उलट्या होणे, बोलण्यात अडचण येणे किंवा हात-पायांची ताकद कमी होणे ही धोक्याची लक्षणे आहेत. अशा वेळी वेळ न दवडता रुग्णालयात दाखल करून सीटी स्कॅनसारख्या आवश्यक तपासण्या करणे गरजेचे आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास गंभीर परिस्थितीतही रुग्ण बरा होण्याची शक्यता असते, असे डॉक्टरांनी सांगितले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button