Sport

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न

१८३ खेळाडूंचा सहभाग; विविध गटांतील विजेत्यांचा गौरव

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा २०२६ उत्साहात पार पडल्या. ३ ते ५ जुलैदरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धांमध्ये जिल्हाभरातील १८३ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

विविध गटांत रंगल्या चुरशीच्या लढती

स्पर्धेत ९, ११, १३, १५, १७ आणि १९ वर्षांखालील मुले-मुलींचे एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी सामने, तसेच पुरुष, महिला खुला गट आणि ३५ वर्षांवरील गटातील सामने खेळविण्यात आले. जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव आणि चोपडा येथील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे खजिनदार तथा जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू वृषाली पाटील, प्रशिक्षक अतुल देशपांडे आणि मुख्य पंच दीपिका ठाकूर उपस्थित होते. विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना पदके, क्रीडा साहित्य व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

राज्य स्पर्धेसाठी विजेत्यांची निवड

या निवड चाचणीतील विजेते खेळाडू आगामी महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा चषक स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विजेत्या खेळाडूंना जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व सचिव विनीत जोशी यांनी शुभेच्छा दिल्या.

यशस्वी आयोजनासाठी परिश्रम

स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून दीपिका ठाकूर यांनी जबाबदारी सांभाळली. पंच म्हणून पूनम ठाकूर, शुभम चांदसरकर, फाल्गुन पाटील, रजत पटेल, उदित मुंदडा आणि शंतनु फालक यांनी काम पाहिले. प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्वयंसेवकांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनही किशोर सिंह सिसोदिया यांनी केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button