Sport

क्रीडाप्रेमींसाठी खुशखबर : सागर पार्क मैदान क्रिकेट लीगसाठी मिळणार, पण..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील सागर पार्क मैदान खेळासाठी आरक्षण न देणेबाबत आगामी मनपा महासभेत विषय ठेवण्यात येणार होता. नगरसेवक नितीन बरडे यांनी मांडलेल्या या ठरावाला समस्त क्रिकेट प्रेमींकडून विरोध होत होता. भाजप पक्षश्रेष्ठी आणि आमदार राजुमामा भोळे यांच्यापर्यंत हा विषय पोहचल्याने त्यात आज तोडगा निघाला आहे.

जळगावकर क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंसाठी हक्काचे ठिकाण मानले जाणारे महापालिकेचे सागर पार्क मैदान आता खेळासाठी उपलब्ध न ठेवण्याचा प्रस्ताव महासभेच्या अजेंड्यावर ठेवण्यात आला आहे. यावर १४ मे रोजी चर्चा होणार आहे. नगरसेवक नितीन बरडे यांनी हा प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावामुळे क्रीडा वर्तुळात तीव्र नाराजी पसरली आहे.

जळगावातील क्रीडा प्रेमी आणि क्रिकेट प्रेमींनी एकजूट दाखवत या निर्णयाला विरोध दर्शवला होता. खेळाडूंनी हा विषय आमदार राजुमामा भोळे आणि मनपा उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडे मांडला होता. तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे देखील आपली कैफियत मांडली होती. अखेर आज या विषयावर पक्षांतर्गत चर्चा झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पक्षांतर्गत बैठकीत या विषयावर जोरदार चर्चा झाली. सागर पार्क मैदानावर खेळाला बंदी न घालता काही अटी शर्ती घालून देण्यात येणार आहे. त्यात डीजे बंदी, साउंड सिस्टिम असल्यास कमी आवाज, १० वी, १२ वी परीक्षा काळात खेळाला बंदी असे काही नियम लागू करण्यात येणार आहेत. आ.राजुमामा भोळे यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button