Crime

तहसीलदारांच्या नावाने मागितली लाच; दोघे एसीबीच्या जाळ्यात

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे। तहसीलदारांच्या नावाने लाच मागणाऱ्या दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, लाच दोघे स्वतःसाठी मागत होते की महसूल विभागाचे काही लागेबांधे आहेत याचा शोध घेणे महत्वाचे आहे.

या प्रकरणातील संशयीत आरोपींमध्ये रामराव हरचंद पाटील (वय ६५, रा. लोणपंचम, ता. अमळनेर, जि. जळगाव) आणि जितेंद्र राजेंद्र पाटील (वय २६, रा. झाडी, ता. अमळनेर) यांचा समावेश आहे. तक्रारदार हे गौण खनिज वाहतूक व्यवसाय करीत असून त्यांच्या दोन ट्रॅक्टरद्वारे नदीपात्रातून वाळू वाहतूक केली जात होती. ही वाहतूक सुरू ठेवण्यासाठी आरोपींनी तहसीलदारांच्या नावाने प्रत्येकी ट्रॅक्टरमागे २५ हजार रुपये, अशा एकूण ४० हजार रुपयांची लाच मागितली होती.

सापळा रचून दोघांना पकडले
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तक्रार दाखल केली. २८ एप्रिल रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता लाच मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचून कारवाई केली. कारवाईदरम्यान आरोपींनी ४०,००० रुपयांची मागणी केली असता, त्यापैकी २५,००० रुपये जितेंद्र पाटील यांनी स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पथकात यांचा होता समावेश
या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथील पोलीस उपअधीक्षक सचिन सांडुगे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक पवनावळे यांनी सापळा अधिकारी म्हणून, तर पोलीस निरीक्षक यशवंत बोरे यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच सापळा पथकात पोहेकॉ. राजन कदम, पोहेकॉ. मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, पोहेकॉ. मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिंदे, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सेंदाणे, मपोको. रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे आणि पोहेकॉ. जगदीश बडगुजर यांनी सहभाग घेतला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button