Crime

ब्रेकींग : माजी महापौर ललित कोल्हे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जवळील ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊसवर झालेल्या पोलीस छापेमारी प्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून कारागृहात असलेले जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांना अखेर दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोल्हे यांचा जामीन मंजूर केला असल्याची माहिती त्यांच्या पत्नी सरिता माळी-कोल्हे यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?
काही महिन्यांपूर्वी जळगाव पोलिसांनी ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊसवर छापा टाकला होता. या ठिकाणी बेकायदेशीर कॉल सेंटर चालवून विदेशी नागरिकांची ऑनलाइन लूट केली जात असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. या कारवाईत ललित कोल्हे यांच्यासह कोलकाता येथील चार संशयित आणि इतर अशा एकूण आठ जणांना अटक करण्यात आली होती. तपासाधिकारी उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी न्यायालयात हा संघटित गुन्हेगारीचा (ऑर्गनाइज्ड क्राईम) प्रकार असल्याचे सांगत पोलिसांची बाजू मांडली होती.

कायदेशीर लढा
या गुन्ह्यात अटक झाल्यापासून ललित कोल्हे हे नाशिक मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. यापूर्वी जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले होते. त्यामुळे कोल्हे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती.

अखेर मिळाला दिलासा
सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ललित कोल्हे यांना जामीन मंजूर केला आहे. दीर्घकाळ चाललेल्या या कायदेशीर प्रक्रियेनंतर कोल्हे यांना जामीन मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कुटुंबियांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कोल्हे लवकरच कारागृहाबाहेर येण्याची शक्यता आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button