Other

ब्रेकिंग : मानराज मोटर्सला भीषण आग, १५ बंब संपले तरी आग सुरूच..

महा पोलीस न्यूज । दि.८ जानेवारी २०२४ । जळगाव येथील एमआयडीसी परिसरातील मानराज मोटर्स शोरूमला आज सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी प्रचंड होती की, अग्निशमन दलाच्या पंधरा बंबांच्या सहाय्यानेही तिला नियंत्रणात आणता आलेले नसून अद्याप आग सुरूच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील एमआयडीसी परिसरात मानराज मोटर्स शोरूम आहे. सकाळी ७ वाजेच्या सुमारास शोरूममध्ये दुसऱ्या माळ्यावर असलेल्या साहित्य ठेवलेल्या गोदामला अचानक आग लागली. बंदिस्त असल्याने आग काही वेळातच पसरली. खिडकीतून आगीचे लोळ बाहेर येत होते तर धूर दूरवरून दिसत होता.

आगीमुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले असून, शोरूममधील साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अविरत प्रयत्न करत असून, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले आहेत.

एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button