पिचर्डे येथील जवान संजय महाजन यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

भडगाव l महापोलीस न्यूज l १४ मे २०२५
पिचर्डे येथील सी.आर.पी.एफ जवान शहीद संजय भगवान महाजन यांना सेवेत कार्यरत असतांना विरगती प्राप्त झाली होती.शहिद जवान संजय महाजन यांचे प्रार्थिव गावात सकाळी 11वाजता आल्यावर गावात अंत्ययात्रा काढण्यात आली त्यानंतर त्यांच्या दुपारी 1 वाजता मुलाने अग्नीडाग दिला यावेळी सर्वांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले यावेळी पोलीस दलाकडून व भारतीय सैन्य दलाकडून सलामी देण्यात आली यावेळी .सी.आर.पी.एफ चे इन्स्पेक्टर संतोष कुमार, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मस्के, पोलिस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे नायब तहसीलदार सुधिर सोनवणे, जिल्हा सैनिक बोर्ड चे अधिकारी रतिलाल महाजन सैनिक आघाडी चे समाधान पाटील व तसेच सैनिक आघाडी चे सर्व पदाधिकारी, पोलिस पाटील श्रीमती चेतना पाटील, ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी तसेच राजकीय क्षेत्रातील आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील,शेतकरी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, संचालक योजनाताई पाटील राकेश संजय पाटील, यांच्या सह तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.