एशियन सीनियर फेन्सिंग चॅम्पियनशिपच्या तयारीचा रक्षा खडसे यांनी घेतला आढावा

एशियन सीनियर फेन्सिंग चॅम्पियनशिपच्या तयारीचा रक्षा खडसे यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली | प्रतिनिधी
केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री यांनी नवी दिल्लीतील येथे आयोजित करण्यात येणाऱ्या एशियन सीनियर फेन्सिंग (तलवारबाजी) चॅम्पियनशिप 2026 च्या तयारीचा गुरुवारी आढावा घेतला. 19 ते 24 जूनदरम्यान होणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेचे यजमानपद प्रथमच भारत भूषवत आहे.
यावेळी आणि उपस्थित होते. खडसे यांनी स्पर्धेसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधा, खेळाडूंसाठीच्या सोयी, तंत्रज्ञानाधारित पंच प्रणाली, स्पर्धा व्यवस्थापन आणि अन्य तयारीची पाहणी केली.
19 जून रोजी सायंकाळी 6 वाजता भारत मंडपमच्या हॉल क्रमांक 2-3 मध्ये “One Dream | One Blade | One Pride” या संकल्पनेवर आधारित भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे. उद्घाटन समारंभास केंद्रीय क्रीडा मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत 36 देशांतील 787 मान्यताप्राप्त प्रतिनिधी सहभागी होणार असून त्यामध्ये 406 खेळाडू, 75 प्रशिक्षक, 9 व्यवस्थापक, 13 सहाय्यक कर्मचारी, 40 प्रतिनिधी, 28 स्वयंसेवक आणि 151 स्थानिक आयोजन समिती सदस्यांचा समावेश आहे.
यावेळी रक्षा खडसे म्हणाल्या की, पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक क्रीडा शक्ती म्हणून उदयास येत आहे. ‘खेलो भारत नीती 2025’ अंतर्गत क्रीडा पायाभूत सुविधा मजबूत करणे, खेळाडूंना सक्षम बनविणे, नवोदित क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्याची क्षमता वाढविणे यावर भर दिला जात आहे.
त्यांनी सांगितले की, अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे भारतीय खेळाडूंना जागतिक दर्जाचा अनुभव मिळतो, क्रीडा उत्कृष्टतेला चालना मिळते आणि देशातील आधुनिक क्रीडा परिसंस्था अधिक सक्षम होते. ही स्पर्धा भारतातील तलवारबाजीच्या विकासाला नवी दिशा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारत मंडपमसारख्या जागतिक दर्जाच्या स्थळी होत असलेले हे आयोजन भारताच्या वाढत्या क्रीडा क्षमतेचे आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा आयोजनातील वाढत्या भूमिकेचे प्रतीक मानले जात आहे. ‘विकसित भारत @2047’च्या संकल्पनेला गती देण्यासाठी क्रीडा क्षेत्राला विकासाचे प्रभावी माध्यम बनविण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा हा महत्त्वाचा भाग असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.





