Other

भडगाव शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या सुरक्षेबाबत दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल

भडगाव शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या सुरक्षेबाबत दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल

भडगाव (प्रतिनिधी)

भडगाव शहरातील साकेत कॉलनी परिसरात नव्याने उभारलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये लहान मुले पोहत असल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आल्यानंतर भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, भडगाव शहराच्या वतीने शहराध्यक्षा योगीता अनील वाघ यांच्या नेतृत्वाखाली व महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस नुतनताई पाटील व भाजप तालुका उपाध्यक्षा सुशिलाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा श्रीमती, रेखा मालचे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात पिण्याच्या पाण्याच्या टाकीची तात्काळ स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, टाकी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करणे, संबंधितांवर कारवाई करणे तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती.
निवेदनाची नगर परिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेत, नगर परिषद पाणीपुरवठा विभाग कर्मचारी श्री. विशाल महाजन व श्री.कमलाकर देशमुख यांनी घटनास्थळी कामास सुरुवात करून आवश्यक कार्यवाही सुरूवात केली. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने अशीच तत्परता कायम ठेवावी व पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करावी, व शहरातील अशा आवारात CCTV लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. सुषमा पाटील, अनिता भोई, उषाताई पाटील, रेखाताई पाटील, संगीता परदेशी, सुनिता सोनवणे, लता सपकाळे, कल्पनाताई भंडारे आदी महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, भडगाव शहराने यापुढेही नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button