Other

भुसावळात पहाटेच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मोठी कारवाई

९९ आरोपींची पडताळणी, गावठी कट्टा, तलवारींसह शस्त्रसाठा जप्त; २३ संशयित वाहने ताब्यात

भुसावळात पहाटेच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मोठी कारवाई

९९ आरोपींची पडताळणी, गावठी कट्टा, तलवारींसह शस्त्रसाठा जप्त; २३ संशयित वाहने ताब्यात

भुसावळ | प्रतिनिधी

भुसावळ शहरात १० जून २०२६ रोजी पहाटे ३ ते सकाळी ९ वाजेदरम्यान पोलिसांनी राबविलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हेगारीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सराईत गुन्हेगार, संशयित व्यक्ती, अवैध धंदे आणि शस्त्रसाठ्यावर धडक कारवाई करत अनेक महत्त्वपूर्ण यश पोलिसांना मिळाले.

कारवाईदरम्यान एकूण ९९ आरोपी व संशयितांची पडताळणी करण्यात आली. तसेच ६३ संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली असून त्यांचे ‘इंटरोगेशन फॉर्म’ भरून माहिती संकलित करण्यात आली.

वाहन तपासणीत २३ संशयित वाहने जप्त

विशेष मोहिमेदरम्यान ११२ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी मालकी व कागदपत्रांबाबत संशय असलेली २३ वाहने पुढील चौकशीसाठी जप्त करण्यात आली आहेत.

गावठी कट्टा, तलवारी आणि कोयता जप्त

पोलिसांच्या धडक कारवाईत एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, दोन तलवारी आणि एक कोयता जप्त करण्यात आला. या प्रकरणी आर्म्स ॲक्टनुसार एकूण चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हातभट्टीवर धाड, चोरीची दुचाकी हस्तगत

मोहिमेदरम्यान महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १४२ अन्वये एक कारवाई करण्यात आली. तसेच चोपडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील एक दुचाकी वाहन हस्तगत करण्यात आले.

शहरालगतच्या भागात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर तीन ठिकाणी धाड टाकण्यात आली. या कारवाईत सुमारे १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे रसायन नष्ट करण्यात आले.कारवाईदरम्यान मध्यप्रदेशातील खंडवा येथील रेल्वे पोलिसांना (GRP) हवा असलेला एक आरोपीही पोलिसांच्या हाती लागला. त्याला पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

२० अधिकारी, २०० कर्मचारी मैदानात

ही विशेष मोहीम अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. मोहिमेसाठी २० पोलीस अधिकारी, २०० पोलीस अंमलदार आणि ५ आरसीपी प्लाटूनचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button