Crime

महादेव सट्टा अ‍ॅप प्रकरणी सीबीआयची छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई

महादेव सट्टा अ‍ॅप प्रकरणी सीबीआयची छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई

नवी दिल्ली ;- महादेव सट्टा अ‍ॅप प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, भिलाईचे आमदार देवेंद्र यादव, तसेच पाच आयपीएस अधिकारी आणि दोन कॉन्स्टेबल यांच्या घरांवर छापेमारी केली. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

रायपूर आणि भिलाईतील ठिकाणांवर छापे

बुधवारी पहाटे सीबीआयच्या 10 हून अधिक पथकांनी रायपूरहून छापे टाकण्यास सुरुवात केली. भूपेश बघेल यांचे रायपूर आणि भिलाईमधील घर, आमदार देवेंद्र यादव यांचा सेक्टर 5 मधील बंगला, आयपीएस अधिकारी अभिषेक पल्लव (सेक्टर 9), एएसपी संजय ध्रुव, एएसपी आरिफ शेख, आनंद छाब्रा, प्रशांत अग्रवाल यांची निवासस्थाने , महादेव सट्टा अ‍ॅपशी संबंधित कॉन्स्टेबल नकुल आणि सहदेव यांचे नेहरू नगर येथील घर

ही संपूर्ण कारवाई महादेव सट्टा अ‍ॅपच्या ऑपरेशन आणि पैशांच्या व्यवहारांशी संबंधित आहे. छाप्यांदरम्यान सीबीआयने काही महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल डेटा जप्त केल्याची माहिती समोर येत आहे.

भूपेश बघेल यांच्या घरावर छापा, कुटुंबीय नजरकैदेत

सीबीआयच्या पथकाने पहाटेच भूपेश बघेल यांच्या रायपूर आणि भिलाई येथील घरांवर छापे टाकले. कुटुंबातील सदस्यांना घरातच ठेवण्यात आले आहे, तर घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

होळीपूर्वी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) नेही भूपेश बघेल यांच्या घरावर छापा टाकला होता. तब्बल 10 तास चौकशी करून 32-33 लाख रुपये आणि कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती. यामध्ये मंटुराम प्रकरणाशी संबंधित एक पेन ड्राइव्ह देखील जप्त करण्यात आला होता.
आयपीएस अधिकारी आरिफ शेख यांच्या घराबाहेर सुरक्षा तैनात

सीबीआयचे पथक सकाळीच रायपूर येथील आयपीएस अधिकारी आरिफ शेख यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्या घराबाहेरही सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
सीबीआयच्या या कारवाईमुळे भूपेश बघेल आणि देवेंद्र यादव यांचे समर्थक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी जमू लागले आहेत. पुढील काही तासांत या तपासावर मोठी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button