Politics

भाजप जळगाव पश्चिम जिल्हा चिटणीसपदी गोरख  माळी यांची नियुक्ती

भाजप जळगाव पश्चिम जिल्हा चिटणीसपदी गोरख  माळी यांची नियुक्ती

भडगाव,(प्रतिनिधी) :- भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्हा ओबीसी मोर्चाच्या वतीने पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप जळगाव पश्चिम जिल्हा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपाल रामकृष्ण भंगाळे यांनी  गोरख रघुनाथ माळी यांची जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती केली आहे.

ही नियुक्ती पक्षाचे वरिष्ठ नेते, राज्य व केंद्रीय पातळीवरील नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून आगामी काळात संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

गोरख माळी यांनी यापूर्वी पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत संघटनात्मक कामात चांगले योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत पक्षाने ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
नियुक्तीनंतरपक्षकार्यकर्त्यांकडून श्री. गोरख रघुनाथ माळी यांचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button