OtherCrime

गॅरेजचे शटर फोडून बुलेटच्या सुट्या भागांवर चोरट्यांचा डल्ला

गॅरेजचे शटर फोडून बुलेटच्या सुट्या भागांवर चोरट्यांचा डल्ला

बी. जे. मार्केट परिसरातील घटना; ३० हजारांचा ऐवज लंपास, जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा

जळगाव | प्रतिनिधी

शहरातील बी. जे. मार्केट परिसरात असलेल्या एका बुलेट दुरुस्तीच्या गॅरेजचे शटर फोडून चोरट्यांनी बुलेटचे इंजिन, गिअर बॉक्स, मॅक व्हील, शॉकअपसह विविध सुटे भाग चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला असून, याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अयोध्यानगर येथील रहिवासी अनिल पांडुरंग पाटील (वय ६०) यांचे बी. जे. मार्केट परिसरातील जे. एम. पी. मार्केटसमोर बुलेट दुरुस्तीचे गॅरेज आहे. २१ जुलै रोजी सायंकाळी त्यांनी दुरुस्तीसाठी आलेल्या बुलेटचे इंजिन व इतर सुटे भाग गॅरेजमध्ये ठेवून दुकान बंद केले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर शटर उघडलेले दिसल्याने चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

चोरट्यांनी गॅरेजमधील दोन जुनी बुलेट इंजिने, दोन क्लच कव्हर, गिअर बॉक्स, बुलेटचे हेड, मॅक व्हील आणि शॉकअप पाईप असा एकूण सुमारे ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच अनिल पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button