Other

रामानंद नगर पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघड; दोघांना अटक

रामानंद नगर पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघड; दोघांना अटक

 दुकानातील ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून यश

जळगाव | प्रतिनिधी

पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केट येथील पान मसाल्याच्या दुकानात झालेल्या घरफोडीचा गुन्हा रामानंद नगर पोलिसांनी वेगाने उघडकीस आणत दोन जणांना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेला ३७ हजार ८०० रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दुकानाचे शटर उचकटून केली होती चोरी

७ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सोमानी मार्केट येथील पान मसाल्याच्या दुकानाचे शटर उचकटून विविध कंपन्यांच्या सिगारेटचे १० बॉक्स आणि रोख रक्कम असा एकूण ३७ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून धागेदोरे

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी विशेष तपास पथक स्थापन केले. पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण करून संशयितांचा माग काढला.

तपासादरम्यान पिंप्राळा हुडको परिसरातील सिद्धार्थ विनोद आढाळे (वय १९) आणि दीपक भगवान सोनवणे (वय २०) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या पथकाची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. सुखाकर अंभोरे, सुशील चौधरी, अतुल चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल सागर नवघरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button