Other

भडगावातील जागृती वाचक कट्टा ‘उजेड पेरणारी माणसं’ने उजडला

भडगावातील जागृती वाचक कट्टा ‘उजेड पेरणारी माणसं’ने उजडला

भडगाव ( प्रतिनिधी )

शहरात जागृती मित्र मंडळ संचलित जागृती वाचनालयात शनिवारी ‘वाचक कट्टा’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. त्यात भडगाव येथील पत्रकार संजय पवार यांनी भुसावळ येथील लेखक आनंदा पाटील लिखित ‘उजेड पेरणारी माणसं’ हे पुस्तक वाचनालयाला भेट दिले. पडद्याआडच्या माणसांची गाेष्ट असलेल्या या बहुचर्चित पुस्तकावर त्यात चर्चा झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय पवार यांनी या पुस्तकाला पुण्याच्या पेन प्रकाशनचे देवा झिंजाड यांनी लिहिलेली प्रस्तावना आणि खुद्द लेखकाचे ‘अंतरीचे बोल’ मनोगत उपस्थित वाचकांसमाेर मांडले. यात ‘अंतरीचे बोल’ या मनाेगतातील वस्तुस्थिती मांडत असताना रामायणतील रामाचा उल्लेख पित्याचे वचन पाळणत रामने वनवास भोगला तर वडीलांना पुस्तक लिहिण्याचा शब्द देऊन ते वचन पाळणारा आधुनिक राम असा उल्लेख लेखकाचा करून त्याची माहिती दिली. या पुस्तकात उल्लेख असलेल्या ८४ ‘उजेड पेरणारी माणसां’पैकी काही प्रातिनिधिक व्यक्तींचा नामोल्लेख करून, त्यांनी समाजात स्वतःच्या कर्तृत्वाने कसा प्रकाश पसरवला याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
आपल्या आजूबाजूच्या परिसरातही समाजासाठी झटणारी व योगदान देणारी अशी अनेक माणसे असतात, त्यांची माहिती प्रत्येकाने घेतली पाहिजे. सर्वांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे, असे आवाहन संजय पवार यांनी आपल्या मनोगतात केले. या पुस्तकातील प्रत्येक शब्द म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत आपला स्वार्थ विसरून दुसऱ्यासाठी झटणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा एक कृतज्ञ दस्तऐवज आहे असेही त्यांनी नमूद केले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button