Crime

मध्य प्रदेशातून येणारी बैलांची गाडी गोरक्षक दलाने पकडली

मध्य प्रदेशातून येणारी बैलांची गाडी गोरक्षक दलाने पकडली

वडती-विष्णापूर रस्त्यावर कारवाई; गाडी व चालक अडावद पोलिसांच्या ताब्यात, पोलीस चौकी उभारण्याची ग्रामस्थांची मागणी

अडावद, प्रतिनिधी : वडती-विष्णापूर रस्त्यावर मध्य प्रदेशातून येणारी बैलांची गाडी वडती येथील गोरक्षक दलाने मंगळवारी सायंकाळी अडवली. गाडीमध्ये दोन बैल आढळून आल्यानंतर गोरक्षक दलाने तत्काळ अडावद पोलिसांशी संपर्क साधून गाडी आणि चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.

गाडीचा क्रमांक एमएच १९ सीएक्स २८३० असून ती सुपर कॅरी प्रकारातील आहे. या प्रकरणी अडावद पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, गाडी व संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे.

पोलीस चौकी उभारण्याची मागणी

या घटनेनंतर वडती व विष्णापूर येथील ग्रामस्थांनी विष्णापूर रस्त्यावर कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली आहे. मध्य प्रदेशातून या मार्गाने ये-जा करणाऱ्या संशयित वाहनांची नियमित तपासणी झाल्यास अवैध वाहतूक रोखण्यास मदत होईल, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे.

गोरक्षक दलाने वेळीच पोलिसांना माहिती दिल्याने कारवाई करणे शक्य झाले. या प्रकरणाचा पुढील तपास अडावद पोलीस करीत असून, चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button