Crime

धक्कादायक : महिलेसमोर मारहाण, पोलीस कर्मचाऱ्याने संपवले जीवन

महा पोलीस न्यूज । १७ जून २०२४ । एका लग्नासाठी गावात गेल्यानंतर तेथे काही जणांनी महिला नातेवाईकसमोर मारहाण केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलने विष प्राशन करत आत्महत्या केली केल्याची घटना समोर आली आहे. कॉन्स्टेबलच्या खिशात आढळून आलेल्या सुसाइड नोटमधून ही बाब समोर आली. सुनील सुखदेव सार्वे (५६, पिपळा फाटा, हुडकेश्वर मार्ग) असे मृत कॉन्स्टेबलचे नाव आहे.

मुळचे गुंथारा (जि.भंडारा) येथील रहिवासी असलेले सुनील सुखदेव सार्वे (५६, पिपळा फाटा, हुडकेश्वर मार्ग) हे पोलीस दलात कार्यरत आहेत. ते दि.२६ मे रोजी पत्नी व बहिणीसह लग्नासाठी गुंथारा येथे गेले होते. गावामध्ये गेल्यावर त्यांना भोजराज सार्वे, शेषराव सार्वे, नीलेश सार्वे, धनराज सार्वे, भूषण सार्वे यांनी मारहाण केली होती. सर्व प्रकार एका महिला नातेवाइकासमोर मारहाण झाली होती.

लग्नाहून परतल्यानंतर ते ड्युटीवरही गेले व त्यांनी विष घेतले होते. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या खिशात दिसलेल्या चिठ्ठीमध्ये आत्महत्येचे कारण नमूद होते. लग्नात एका महिला नातेवाइकासमोर मारहाण झाली होती. त्या मनस्तापात आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे त्यांनी लिहिले होते. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसात आरोपींविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button