Crime

जळगावमध्ये मंदिरात चोरीप्रकरणी तीन अल्पवयीन चोरटे पोलिसांच्या ताब्यात, १४ हजारांची रोकड व दानपेटी जप्त

जळगावमध्ये मंदिरात चोरीप्रकरणी तीन अल्पवयीन चोरटे पोलिसांच्या ताब्यात, १४ हजारांची रोकड व दानपेटी जप्त

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील गणपती नगर परिसरातील गणपती मंदिरातून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ५ ते ६ जूनच्या दरम्यान रात्री मंदिराचा कडीकोयंडा तोडून तीन अल्पवयीन मुलांनी दानपेटी चोरली होती. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत १४ हजार रुपयांची रोकड व पाच हजार रुपये किमतीची दानपेटी हस्तगत केली असून, संबंधित तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ जून रोजी रात्री मंदिराचे पुजारी मंदिर बंद करून गेले होते. त्यानंतर रात्रीच्या वेळी चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटी लंपास केली. विलास रमेश सांगोरे (वय ५२, रा. आदर्श नगर) यांनी याबाबत रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोहेकॉ. सुशील चौधरी यांनी कारवाई करत तिन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम १४,००० रुपये आणि अंदाजे ५,००० रुपये किमतीची दानपेटी जप्त करण्यात आली आहे. मुलांना समज दिल्यानंतर पालकांच्या ताब्यात सुपूर्त करण्यात आले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button