Other

भडगाव दिवाणी न्यायालयात विशेष लोकअदालत संपन्न; २५ हजार रुपयांची वसुली

भडगाव दिवाणी न्यायालयात विशेष लोकअदालत संपन्न; २५ हजार रुपयांची वसुली

भडगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार, तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ, भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दिवाणी न्यायालयात शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर २०२६) विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

या विशेष लोकअदालतीत तडजोडीअंती २५ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या लोकअदालतीच्या कामकाजासाठी पॅनल प्रमुख म्हणून मा. न्यायाधीश पी. व्ही. राजळे यांनी, तर पॅनल सदस्य म्हणून ॲड. पी. जी. सोनवणे यांनी काम पाहिले.

परस्पर सामंजस्याने आणि तडजोडीने दावे निकाली निघाल्याने पक्षकारांचा वेळ व पैशांची बचत झाली असून, या विशेष लोकअदालतीस न्यायालयीन कर्मचारी होतीलाल पाटील,मनोज वाणी, अभिजीत दायमा, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बी. आर. पाटील, ॲड. आर. के. वाणी व पक्षकारांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button