OtherEducation

पंकज माध्यमिक विद्यालयात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांचा वृक्षारोपणचा निर्धार

पंकज माध्यमिक विद्यालयात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांचा वृक्षारोपणचा निर्धार

चोपडा(प्रतिनिधी) – येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सामाजिक वनीकरण विभाग व पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रम अंतर्गत विविध रोपांचे वाटप करून सर्व विद्यार्थ्यांना वृक्षारोपण साठी प्रोत्साहित करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी ,आई सारखाच जिव्हाळा व प्रेम वृक्षांबाबत संवेदना निर्माण करणे आणि हरित भारताच्या दिशेने पाऊल टाकावे,या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रारंभी विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख शिक्षक पी.सी.पाटील यांनी वृक्षारोपणाबाबत विद्यार्थ्यांना महत्व पटवून इको क्लब च्या सदस्यांच्या सोबतीने रोप वाटप चे नियोजन, रोप लागवड आणि संवर्धन बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.आर.पाटील यांनी देशाचे प्रधानमंत्री यांच्या अभिनव कल्पनेतील एक पेड माँ के नाम या उपक्रमाची सविस्तर माहिती विशद केली आणि वृक्षारोपण आणि संवर्धन साठी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेने आतापर्यंत एक लक्ष पेक्षा जास्त वृक्षारोपण केल्याबद्दल व पर्यावरण संवर्धन साठीच्या राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमात सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपाल अस्मिता पगार यांनी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांना आपल्या आई प्रमाणे जपावे असे सांगत पुढील वर्षी सिड बॉल उपक्रम मोठ्या संख्येने राबविण्याचे आवाहन केले. संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहीत केले.बीज संकलन करून शेताच्या बांधावर बीजारोपण करा, प्रत्येकाने कमीत कमी १ किलो बीज संकलन करून आपल्याला उपलब्ध जागेवर बीजारोपण करावे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. संस्थेने आज पर्यंत सुमारे एक लक्ष वृक्ष लागवड केलेले असून ९८४१ वृक्ष स्वतः संवर्धन केले तसे आपणही स्वतः कमीत कमी १० रोपे लावा असा सल्ला उपस्थितांना त्यांनी दिला. विद्यालयातील विद्यार्थ्यांना सामाजिक वनीकरण विभागातर्फे १०० रोपांचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सविता सोनवणे,वनपाल अस्मिता पगार,वनपाल सविता सोनवणे, वनपाल वैशाली अहिरे, वनपाल आरती मोरे, वनरक्षक कविता पाटील, वनसेवक अंकुश भिल हे उपस्थित होते. सूत्रसंचालन एन.आर. वाघ यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजया पाटील, आर.के.माने, यु.आर.गुजर,संजय भादले, विनोद जाधव,व्ही.ए.निकम,डी.आर.सोनवणे, जयेश मंडपे,बाजीराव तायडे,ज्योतिसिंग राठोड,गोविंदा धनगर, प्रदिप पाटील, केतन माळी, पी.जे.पाटील, वैशाली पाटील, पौर्णिमा भादले, मोनाली देसाई, वैशाली चौधरी, अजय सैंदाने, जितेंद्र महाजन, योगराज रायसिंग, दिवाकर बाविस्कर, सौरभ कुलकर्णी, विजय पाटील , वेलसिंग बारेला, गजानन पाटील, प्रमोद पाटील, कैलास बोरसे आदींनी परिश्रम घेतले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button