EducationSport

आयुष चौधरी आणि जीत धैनजे यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड

आयुष चौधरी आणि जीत धैनजे यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

भुसावळ प्रतिनिधी : डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय आंतरशालेय कराटे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.

इयत्ता दहावीतील आयुष कल्पेश चौधरी आणि इयत्ता नववीतील जीत पंकज धैनजे या दोन्ही विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील आंतरशालेय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आयुष चौधरी याने १७ वर्षांखालील मुलांच्या ६६ किलो वजन गटात प्रभावी कामगिरी केली.

तर जीत धैनजे याने १७ वर्षांखालील मुलांच्या ४० किलो वजन गटात आपल्या खेळातील कौशल्याची छाप पाडली. दोन्ही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पुढील विभागीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळवला.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button