जळगावच्या आठवडे बाजारामधून महिलेचे 73 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी लांबविले

जळगावच्या आठवडे बाजारामधून महिलेचे 73 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी लांबविले
जळगाव, प्रतिनिधी l जळगाव शहरातील कासमवाडी येथील आठवडे बाजारात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील 73 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी, 7 जून 2025 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रविवारी, 8 जून रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाबळ कॉलनी येथील रहिवासी जयश्री संजय धरम (वय 30) या महिला शनिवारी रात्री कासमवाडी येथील आठवडे बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. बाजारातील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 73 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. चोरी झाल्याचे लक्षात येताच जयश्री यांनी परिसरात मंगळसूत्राचा शोध घेतला, मात्र चोरट्याचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम 379 (चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करत आहेत. “