गोशाळेत घडली दुर्दैवी घटना; विषारी साप चावल्याने गायीचा मृत्यू

गोशाळेत घडली दुर्दैवी घटना; विषारी साप चावल्याने गायीचा मृत्यू
वरणगाव (प्रतिनिधी) –
वरणगाव शहरातील नागेश्वर महादेव मंदिराजवळील गोशाळेमध्ये आज (दि. १६ जून) सकाळच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. गोशाळेत असलेल्या एका गायीला विषारी कोब्रा जातीच्या सापाने चावल्याने ती गायी पावली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सदर साप अत्यंत विषारी असून गोशाळेत फिरताना त्याने अचानक गायीला दंश केला. काही वेळातच ती गायी खाली कोसळली. तातडीने उपाययोजना करण्यात आल्या तरी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, पावसाळा सुरू झाल्याने साप, विंचू, घोरपड यांसारखे अनेक विषारी प्राणी आपली निवारा शोधण्यासाठी वस्तीच्या परिसरात आढळून येण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रसंगी सर्प मित्रांची मदत घेणे फायदेशीर ठरते.
वरणगाव येथील सर्पमित्रांची टीम २४ तास सज्ज असून नागरिकांनी साप किंवा इतर वन्य प्राणी आढळल्यास लगेचच खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
सचिन कदम – 9511284298
योगेश भैसे – 7666763102
मुन्ना फलक – 8552090577
या टीमने आतापर्यंत अनेक सर्प व वन्य प्राण्यांची सुटका केली असून, त्यांच्या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.