Other

८ हजार सायकलिस्टच्या भव्य रिंगणाने वेधले संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

८ हजार सायकलिस्टच्या भव्य रिंगणाने वेधले संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

जळगावच्या ग्रुपसोबत महापौर दीपमाला काळे सहभागी

जळगाव/पंढरपूर : जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेली वार्षिक पंढरपूर सायकल वारी यंदाही अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. महापौर दीपमाला मनोज काळे यांनी स्वतः सायकल चालवत सलग दुसऱ्या वर्षी या वारीमध्ये सहभाग घेतला. रविवारी पंढरपुरात राज्यभरातून आलेल्या ८ हजार सायकलिस्टनी सुरुवातीला पंढरपूर शहराला फेरी मारून नंतर घडवून आणलेल्या भव्य आणि शिस्तबद्ध सायकल रिंगणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.

वारीच्या सांगता सोहळ्यात रविवारी, दिनांक १२ जुलै रोजी पंढरपूर येथे एक अभूतपूर्व सोहळा रंगला. संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या विविध सायकलिस्ट ग्रुपच्या सुमारे ८ हजार सायकलपटूंनी पंढरपूरमध्ये सायकलचे एक मोठे आणि भव्य रिंगण तयार केले. या आधी पंढरपूर शहराला देखील त्यांनी पूर्ण एक फेरी मारून मग रिंगण बनवून ते पूर्ण केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे शिस्तबद्ध आणि विहंगम रिंगण पाहण्यासाठी पंढरीत मोठी गर्दी झाली होती. या सायकल रिंगणाने प्रत्येक भाविकाचे डोळे आणि मन मोहून घेतले. या ऐतिहासिक रिंगण सोहळ्यात जळगावच्या महापौर दीपमाला काळे आणि जळगावातील ७५ सायकलिस्ट असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी झाले होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button