Other

जळगाव येथे १३ ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

जळगाव येथे १३ ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

जळगाव, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये EGEARZ या नामांकित उद्योजकासह विविध पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. यामध्ये फिटर, मेंटेनन्स, टर्नर, फाउंड्रीमॅन, मॅकेनिक मशिन टूल, ऑपरेटर अॅडव्हान्स मशिन टूल आदी पदांचा समावेश आहे.

पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. “महास्वयम् रोजगार संकेतस्थळ” https://rojgar.mahaswayam.gov.in येथे नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या यूजर आयडी व पासवर्डने लॉगिन करून उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.

ज्या उमेदवारांनी अद्याप नाव नोंदणी केलेली नाही, त्यांनीही सर्व शैक्षणिक पात्रतेची आवश्यक कागदपत्रे घेऊन मुलाखतीच्या दिवशी उपस्थित राहावे.

याबाबत काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा ०२५७-२९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button