Social

जिल्हा पेठ युवक मित्र मंडळ साकारणार श्री. जगन्नाथपुरीचे भव्य मंदिर

जिल्हा पेठ युवक मित्र मंडळ साकारणार श्री. जगन्नाथपुरीचे भव्य मंदिर

अध्यक्षपदी प्रा. डॉ. नारायण खडके; उपाध्यक्षपदी पूर्वेश काळे, सचिवपदी गणेश कापडे

जळगाव | प्रतिनिधी

जिल्हा पेठ युवक मित्र मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात श्री. जगन्नाथपुरी मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात येणार आहे. मंडळाच्या यंदाच्या कार्यकारिणीची निवड नुकतीच सर्वानुमते करण्यात आली असून अध्यक्षपदी प्रा. डॉ. नारायण खडके, उपाध्यक्षपदी पूर्वेश काळे आणि सचिवपदी गणेश कापडे यांची निवड करण्यात आली.

जिल्हा पेठ युवक मित्र मंडळाच्या सदस्यांची बैठक संस्थापक अध्यक्ष निलेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मंडळाचे यंदाचे ३४ वे वर्ष असून बैठकीत गणेशोत्सवाच्या नियोजनासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी श्री. जगन्नाथपुरी मंदिराचा भव्य देखावा साकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदी प्रा. डॉ. नारायण खडके, उपाध्यक्षपदी पूर्वेश काळे आणि सचिवपदी गणेश कापडे यांची निवड करण्यात आली. यंदाचा गणेशोत्सव आकर्षक आणि सामाजिक उपक्रमांनी परिपूर्ण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

बैठकीस अभय सोमानी, अमोल पाटील, संजीव पाटील, किरण वायगोळे, कौस्तुभ चौधरी, नितीन देशमुख, सुजित चंदनगर, धर्मेंद्र चंदनकर, विजय देशमुख, अनुप जैन, उदय वराडे, दिलीप पाटील, दीपक माळी, सचिन कापडे, मयूर वाघ, सुनील सपके आदींसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button