लोण प्र ऊ येथे पाणंद बंधाऱ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी; ग्रामपंचायतीला दिली सदिच्छा भेट


लोण प्र ऊ येथे पाणंद बंधाऱ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी; ग्रामपंचायतीला दिली सदिच्छा भेट
भडगाव ( प्रतिनिधी)
तालुक्यातील लोण प्र ऊ येथे आज, दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रणधीर सोमवंशी यांनी भेट देऊन परिसरातील पाणंद बंधाऱ्याच्या कामांची सविस्तर पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन प्रशासकीय कामकाज व विकासकामांचा आढावा घेतला. तसेच योजना राबविण्यात मार्गदर्शन केले.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी भडगावचे गट विकास अधिकारी (बीडीओ) श्री .के बी अंजने तसेच विस्तार अधिकारी श्री.अशोक खैरनार हे प्रमुख उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या या पथकाने पाणंद बंधाऱ्याची पाहणी करून जलसंधारणाच्या कामांबाबत व पाण्याच्या साठवणुकीबाबत समाधान व्यक्त केले, तसेच आवश्यक त्या तांत्रिक सूचना दिल्या.
त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोण ग्रामपंचायतीस भेट देऊन विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. या प्रसंगी ग्रामसेवक श्री अनिकेत पाटील, लोकनियुक्त सरपंच ॲड. बी. आर. पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश पाटील, तसेच स्थानिक अंगणवाडी सेविका रेखा पाटील, उशाबाई ब्राह्मणे,अशा सेविका कविता पाटील,crc अनिता ब्राह्मणेआणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील जलसंधारणाच्या कामांना गती देणे आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.







