जळगाव शहर भाजपा अल्पसंख्याक मोर्चाची संघटनात्मक बैठक ; जनसंपर्क वाढवण्यावर भर

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा जळगाव महानगराची महत्त्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. आगामी काळातील पक्षविस्तार आणि संघटनात्मक बांधणी या विषयावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. जळगाव महानगर अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक दीपक सूर्यवंशी आणि अल्पसंख्यक मोर्चाचे नवनियुक्त जिल्हा महानगर अध्यक्ष परवेज खान पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी अल्पसंख्यक मोर्चाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. या प्रसंगी नगरसेवक जाकीर पठाण, सुरेश सोनवणे आणि अतुल बारी यांनीही आपले मनोगत व्यक्त करत पक्ष संघटनेच्या मजबुतीसाठी मार्गदर्शन केले.
या बैठकीला पत्रकार तथा जिल्हा महानगर उपाध्यक्ष वसीम खान, माजी अध्यक्ष अश्फाक खाटिक, अफसर शेख, वसीम शेख, शैलेंद्र परदेशी, वाहतूक आघाडीचे शहर अध्यक्ष जब्बार खान, दीपक परदेशी, मंडळ अध्यक्ष इरफान शेख, लियाकत खान आणि इद्रिस भाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
या महत्वपूर्ण बैठकीला आसिफ सलीम तडवी, हसन शेख, आमिर सय्यद, कलीम पटेल, रवींद्र पाटील, इरफान जे. शेख, दानिश शेख, शाकीर खान, हाशिम बागवान, रेहान रजा, आबिद खान, सलमान खान, निजाम खान, असलम खान, मोहसीन शाह, प्रकाश भंगाळे, तहसील पिंजारी, अरबाज खान, शोएब शेख, शाहिद खान, अजीम शेख, हुसेन भाई यांच्यासह जळगाव महानगरातील भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी जिल्हा अध्यक्ष परवेज खान पठाण यांनी सर्वांचे आभार मानून बैठकीचा समारोप केला.






