PoliticsSocial

राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या जळगाव जिल्ह्यात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या जळगाव जिल्ह्यात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

स्थानिक ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवून सामान्यांसाठी संघर्ष करण्याचा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा निर्धार

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत स्थानिक ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठविण्यासह सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास आर. वाघ यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी देवीदास हटकर, जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रमोद डोंगरे, जळगाव शहर महानगर अध्यक्षपदी संतोष बाविस्कर आणि जळगाव शहर युवक आघाडी अध्यक्षपदी यश कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय जनमंच पक्षाचे विचार आणि पक्षाचे धोरण घराघरात पोहोचविण्यासाठी काम करण्याची ग्वाही दिली. तसेच संघटनात्मक मजबुती वाढवून पक्षाचा विस्तार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

जळगाव जिल्ह्यात गावोगावी पक्षाच्या शाखांचे उद्घाटन करून संघटन वाढविण्याच्या सूचना प्रदेश सचिव संदीप लांडगे यांनी यावेळी दिल्या. पक्षाची विचारधारा आणि धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीच्या शेवटी चाळीसगाव तालुका अध्यक्ष सुरेश वेळीस यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश राठोड, जळगाव जिल्हा शेतकरी आघाडी अध्यक्ष विजय पाटील, जळगाव जिल्हा सचिव अमृत निंबा सैंदाणे, चोपडा तालुका अध्यक्ष सुरेश सोनवणे, चाळीसगाव तालुका दिव्यांग आघाडीचे महेंद्र बागुल, रवींद्र वसंतराव महाजन, विलास शिंदे, कैलास जोशी, पुंडलिक महाजन, आदित्य चौधरी, भैय्यासाहेब निकम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button