Other

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

जळगाव, —: शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह शासकीय यंत्रणेकडून त्यांचे प्रश्न सोडविण्याची व्यवस्था करण्यात येते.

मात्र, सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला महिला लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button