Other

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ‘लकी टेलर’ यांची बिनविरोध निवड

राजकीय घडामोडींना पूर्णविराम; लक्ष्मण पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ‘लकी टेलर’ यांची बिनविरोध निवड

राजकीय घडामोडींना पूर्णविराम; लक्ष्मण पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब

जळगाव : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या राजकीय नाट्याला अखेर आज (दि. १८) पूर्णविराम मिळाला असून लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ ‘लकी टेलर’ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापतीपदासाठी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे ठराव दाखल करण्यात आला होता. मात्र, त्याआधीच विद्यमान सभापती सुनील महाजन यांनी राजीनामा दिल्याने निवडीचा मार्ग मोकळा झाला.

गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीच्या सभापतीपदासाठी मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असतानाही सभापती निवडीवरून अंतर्गत राजकारण रंगले होते. याआधी शामकांत सोनवणे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून सुनील महाजन यांची सभापतीपदी निवड झाली होती. मात्र, अवघ्या सहा ते सात महिन्यांतच संचालकांनी सुनील महाजन यांच्या विरोधात पुन्हा अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.

या पार्श्वभूमीवर सुनील महाजन यांनी राजीनामा न देता मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संचालकांसोबत बैठक घेतली. मात्र, सभापतीपदासाठीचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते.

दरम्यान, सभापतीपदासाठी मनोज दयाराम चौधरी, लकी टेलर आणि मिलिंद चौधरी या नावांची चर्चा सुरू होती. अखेर लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

यापूर्वी दोन वेळा सभापतीपद हुलकावणी दिल्यानंतर अखेर लक्ष्मण पाटील यांना संधी मिळाल्याने “लकी टेलर अखेर खरेच लकी ठरले” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

निवडीच्या वेळी आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह बाजार समितीचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड जाहीर होताच नूतन सभापतींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी उर्वरित तीन वर्षांच्या कार्यकाळात तीन सभापती आणि तीन उपसभापती होणार असल्याचे सूतोवाच करत पुढील राजकीय समीकरणांची झलक दिली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button