Other

पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार; ममुराबाद येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार; ममुराबाद येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व प्रज्ञावंत फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम; आदिवासी विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या व शैक्षणिक साहित्याचे वितरण

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिवासी वस्तीत मोठ्या प्रमाणावर पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले होते. या नैसर्गिक आपत्तीनंतर तातडीने मदतकार्य राबविण्यात आल्यानंतर आता पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई आणि प्रज्ञावंत फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास बॉक्स तसेच अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष तथा प्रज्ञावंत फाउंडेशनचे संचालक प्रविण सपकाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले.

यावेळी ममुराबादचे सरपंच हेमंत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य गोपाल मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया विभागाचे जळगाव महानगर अध्यक्ष विक्रम कापडणे, सतीश सैंदाणे, भूषण बोरसे, अशोक मोरे, प्रकाश माळी, मच्छिंद्र सोनवणे, सुकलाल माळी तसेच ग्रामस्थ आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रविण सपकाळे यांनी, आपत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले. गरजू व आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज असून, अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नव्या उमेदीने शिक्षण सुरू ठेवण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाजाप्रती असलेली संघटनेची बांधिलकी अधोरेखित केली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button