Other

श्री मंगळग्रह मंदिरात पंचदिन साध्य विष्णू पंचायन यागास प्रारंभ

श्री मंगळग्रह मंदिरात पंचदिन साध्य विष्णू पंचायन यागास प्रारंभ
अधिकमासानिमित्त धार्मिक वातावरण; डॉ. सुप्रीम पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक पूजा-अर्चा

 महा पोलीस न्यूज | अमळनेर

अधिकमासानिमित्त येथील श्री मंगळग्रह मंदिरात आयोजित पंचदिन साध्य विष्णू पंचायन यागास बुधवारी (दि. ३ जून) सकाळी संकष्टी चतुर्थीच्या पावन पर्वावर मंत्रोच्चार आणि वैदिक विधींनी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. धार्मिक भक्तीभावाने ओतप्रोत भरलेल्या या सोहळ्यात भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

वैदिक विधींनी यागारंभ

आशियास्टार आयकॉन अवॉर्ड प्राप्त, अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तसेच समाजकार्य फाऊंडेशनचे मुख्य यजमान डॉ. सुप्रीम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत खानदेश शिक्षण मंडळाचे चेअरमन विनोद अग्रवाल, मनोहर दीक्षित आणि मंदार कुलकर्णी यांच्या हस्ते सपत्नीक प्रायश्चित्त संकल्प, शांतीपाठ, प्रधान संकल्प, गणपती-वरुण पूजन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्य वरण आणि दिग्रक्षण आदी वैदिक विधी पार पडले.

यानंतर लक्ष्मी-नारायण भद्र मंडल स्थापना, नारायणपीठ देवता पूजन, नारायण यंत्र स्थापना तसेच नारायण, वराह आणि शालिग्राम देवतांचे राजोपचार पूजन करण्यात आले. पुरुषसूक्ताच्या षोडश आवर्तनांसह अभिषेक आणि सहस्त्र तुलसीपत्र अर्चनाने वातावरण भक्तिमय झाले.

हवन आणि विशेष आहुती

दुपारच्या सत्रात यजमानांच्या हस्ते नवग्रह आणि रुद्रकलश स्थापना करण्यात आली. अग्नीमंथन करून अग्निकुंड प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर अग्नी व कुंडदेवता स्थापना, नवग्रह हवन, नारायण सहस्रनाम हवन आणि पायस विशेष आहुती यांसारखे धार्मिक विधी पार पडले.

अधिकमास महात्म्य कथेचे निरूपण

सायंकाळच्या सत्रात नाशिक येथील व्यास आचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी यांनी अधिकमास महात्म्य कथेचे प्रभावी निरूपण करत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. त्यांच्या अमोघ वाणीने भाविक मंत्रमुग्ध झाले. सायंकाळी श्री मंगळग्रह देवतेची महाआरती झाल्यानंतर पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव यांच्यासह आशिष चौधरी, मंदिरातील सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव यांनी मुख्य पौरोहित्य केले. त्यांना प्रसाद भंडारी, परशुराम शर्मा, यश जोशी, गणेश जोशी, वैभव लोकांक्षी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, हेमंत गोसावी आणि उमेश पाठक यांनी सहकार्य केले. कथा निरूपणावेळी चंद्रकांत जोशी आणि कॅसिओ वादक गणेश जोशी यांनी संगीतसाथ दिली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button