
हर्षल पाटील यांची विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड
भडगाव प्रतिनिधी:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मान्यतेने भडगाव तालुक्यातील कनाशी येथील हर्षल संजय पाटील यांची पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार व जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांनी मान्यता दिली आहे.
हर्षल पाटील यांनी यापूर्वी भडगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांच्या याच कामाची आणि संघटन कौशल्याची दखल घेऊन, मतदारसंघाच्या संघटनात्मक विस्तारासाठी पक्षाने त्यांच्यावर ही नवीन व महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीप्रसंगी पक्षाचे सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, महिला कार्याध्यक्षा लता राठोड, उत्तर महाराष्ट्र युवती प्रमुख अभिलाषा रोकडे, युवती जिल्हाध्यक्षा मोनिका पवार, चाळीसगाव तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, शहराध्यक्ष कुशल देशमुख, विद्यार्थी कार्याध्यक्ष अजहर शेख, सागर घुगे, यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हर्षल पाटील यांच्या या निवडीबद्दल राजकीय व सामाजिक स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.







